Tuesday, August 31, 2010

कुणीतरी आठवणं काढतय...


हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

"कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......"

Wednesday, August 25, 2010

आयुष्य खूप सुंदर आहे!


आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर

दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर

अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर

समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर

काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर

फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर

अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर

यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर

मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर

रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर

निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर

वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर

कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर

प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर

"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर

उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....

खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे

उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे

किती छान असतं ना ?
























किती छान असतं
ना ?
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणाच्यातरी पर्सनल डायरित आपलं नाव असणं,
चार-चौघात कुणीतरी सतत आपलाच उल्लेख करणं,
किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपलं हसणं काळजात साठवनं,
कुणालातरी आपला अश्रू मोत्यासमान वाटणं..
किती छान असतं ना,
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपल्या फोनची तासनतास वाट पाहणं,
आपल्याला एकदा ओझार्त पाहण्यासाठी,
तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं,
देवसमोरही स्वताआधी आपलं सुख मागणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी डोळ्यात जीव आणून आपली वाट पाहणं,
आपल्या उपवासा दिवशी त्यानं ही हटकून उपाशी राहणं,
खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..
कुणीतरी आपला विचार करत
पापनीवर पापनी अलगत टेकवनं..
झोपल्यावर मात्र स्वप्नातही आपल्यालाच पाहणं..
खरच, खूप छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं.. !!!!

एक मैत्रीण…….


एक मैत्रीण…….
बोल ना रे काही तरी…
शी बाबा……आज काहीच का बोलत नाहीस…
हळूच मी त्या डोळ्यांकड़े पहिल…
चेहरयावर हास्य मग राहिले…


तिला कुठे माहित…
बोलक्या ओठानचा
आज अबोलच होता…
आवाजासाठी चक्क आतुर होता…
तीच हसन…ते लाजन…
तीच रुसन..तर कधी भांडन…
तिचे प्रश्न…ती उत्तर…
कधी सवांद… तर कधी वाद…
कोण होती ती….???


नव्हती रक्ताची… ना नात्याची….
परी होती ती या मनाची…
स्नेहच्या बंधाची…. अंतरीच्या गाभ्याची…
आठवणींनच्या काही गोड क्षणंची…
होती ती श्रावण सर…
वाळवंटातही ओले चिम्ब करणारी…
की होती ती काजवा…
अंधारया आयुष्याची…


रेशीम गठिंचा बंध होता…
ह्या दोन खुळ्या मनांचा…
मैत्रीचा की प्रेमाचा…
हा प्रश्न नव्हता मनांचा…
तीच्या सोबतचा वेळ क्षणात संपून जाई…
परत भेटीची ओढ़ आता अंतरी राहून जाई…
मी स्वर्ग नाही पहिला…


तीच्या सोबतचा प्रतेक क्षण

प्रेमात पडतांना....


प्रेमात पडतांना'

तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.

तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.

तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.

हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.

ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...'

आठवण माझी कधीतरी येईलच तुला...
























आठवण माझी कधीतरी येईलच तुला

तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल.........

आज हवेत पुन्हा गारवा आहे!


आज हवेत पुन्हा गारवा आहे
शांत वाहणार्‍या वार्यानं
वार्‍या सोबत जमून येणार्‍या ढगानं
ढगांतून येणार्‍या पावसाच्या सरिनन
रस्त्यावरून वाहणार्‍या पाण्याच्या लाटेनं

मातीच्या मंद सुवासानं
गार्याचा पन तिटकारा आहे
आज हवेत पुन्हा गारवा आहे

शब्दांतून येणार्‍या शब्दानं
शब्दांतून येणार्‍या भावनेनं
भावनेतून मिळणार्या कल्पणेनं
कल्पणेतुन जगणार्‍या कवितेनं

कवितेनं उठणार्‍या कळेनं
मनात काहुर माजला आहे
का आज हवेत पुन्हा गारवा आहे?

अचानक... येणार्‍या तिच्या आठवणीनं
तिच्या हसण्यानं... रुसन्यानं
तिच्या बोल बोल बोलण्यानं
तिनं दिलेल्या भेटीनं....
कधी न मिळालेल्या मिठीनं

डोळ्यातून पडून गेलेल्या पावसानं....
.........मनात अजुन ओलावा आहे....

आज हवेत ...पुन्हा... तोच गारवा आहे|

एक तरी मैत्रीण असावी...



एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..
एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..
एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..
एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात

तुलाच शोधतोय!

























तुलाच शोधतोय!
तुलाच शोधतोय!
अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांन

झाड़ वेलीच्या प्रेमात पडल..........


एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,

वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,
पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल,

वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,

काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,

वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ???

ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,

हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,

वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,
कारन .... तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ..

बघ माझी आठवण येते का ?


******* बघ माझी आठवण येते का ? *******

p.c समोर बस orkut मधले a/c उघड
फ्रेंड्स लिस्ट ओपन कर.......
. बघ माझी आठवण येते का ???????????

तुझे scrap बुक उघड ......
त्यातला scrap वाच ............
बघ माझी आठवण येते का ??????????

भेटतील ज़ेव्हा तुला तुझे जिवलग मित्र....
बोलतील ते तुझ्यशि......हसत.........
तेव्हा....बघ माझी आठवण येते का ??????

करशील जेव्हा कोणाशी chating.......
जेव्हा वाचशील कोणाच्या कविता......
बघ माझी आठवण येते का ???????

CUTE LOVE STORY
























CUTE LOVE STORY- A BOY HAD CANCER AND HE HAD ONE MONTH TO LIVE।
HE LIKED A GIRL WORKING IN A CD SHOP VERY MUCH. BUT HE DID NOT
TELL HER ABOUT HIS LUV. EVERYDAY HE WENT TO THE CD SHOP AND
BOUGHT A CD ONLY TO TALK TO HER. AFTER A MONTH HE DIED.
WHEN THE GIRL WENT HIS HOME AND ASKED ABOUT HIM,
HIS MOM TOLD THAT HE DIED AND TOOK HER TO HIS ROOM....................................
.
SHE SAW ALL THE CD'S UNOPENED ............... THE GIRL CRIED N CRIED N FINALLY DIED.
YOU KNOW Y SHE CRIED?
ÇOZ SHE HAD KEPT HER OWN LUV LETTERS INSIDE THE CD PACKS.
SHE ALSO LUVED HIM.............
moral of the story: if u love someone......say to him directly don't wait for
the destiny to play the role.. ............................................

Tuesday, August 24, 2010

Nokia N70 Formating Code by Kishor Ambekar


Soft reset: This will clean up your phone memory. All user data, applications etc stored in the phone memory will be destroyed. Type *#7370#. Enter the security code when prompted; default is 12345.

Hard reset: This is the last resort, if nothing else works. Result is the same as a soft reset. Turn off your phone, press and hold down these keys: the call (Green) button, '*', '3'. Turn on your phone without releasing them. Leave the keys only after you see the region selection screen. You might require multiple attempts because it's a bit tricky holding three keys together.

Reinstall the firmware: Download and install the latest Nokia Software Updater. Make sure your PC is running fine, and the internet connection is stable. Then, connect your phone, and run NSU. Follow on-screen instructions. Make sure that your battery is full and that you have a charger handy, in case the battery wears down.

Sunday, August 15, 2010