Monday, October 4, 2010

आयुष्याला fullstop लागायच्या आधी...


आयुष्याला fullstop लागायच्या आधी
काहीतरी करून दाखवायचय,
लाखोन्च्या गर्दीत स्वतःसाठी
'red carpet' बनवायचय !!

आयुष्याला fullstop लागायच्या आधी
काहीतरी करून दाखवायचय,
आरशासमोर उभ राहून
नजर वर करून 'त्याला' बघायचय,
ताठ मानेनेच 'त्या' समोरच्याला विचारायचय,
तू फ़क्त बोल,अजून कोणत क्षितिज गाठायचय!!

आयुष्याला fullstop लागायच्या आधी
काहीतरी करून दाखवायचय,
सर्वान्च्या मनात एक छोटस
घर करून राहायचय,
माझ्या नुसत्या आठवणीन्तूनच
दुःखी मनान्ना हसवायचय,
एकदा का fullstop लागला
की आठवणीन्तूनच मला पुन्हा जगायचय

गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं.

Sunday, October 3, 2010

मनाला एकदा आसेच विचारले...


मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.

मनाला एकदा आसेच विचारले...


















मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.

तू म्हणतेस म्हणुन बोलतोय...




















तू म्हणतेस म्हणुन बोलतोय

तू म्हणतेस..
’तू नजरेला नजर देवुन कधीच का बोलत नाहीस
कधी कधी असं वाटत तू मला ओळखतच नाहीस’
मी म्हणतो..
’तुझ्या डोळ्यात पाहील्यावर मला हरवायला होतं
काय बोलायच असत नेमकं तेच विसरायला होतं’

तू म्हणतेस..
’शी बाबा तू ना खरच असा कसा आहेस रे
सगळ्यांपासून वेगळा किती वेडा आहेस रे’
मी म्हणतो..
’जेंव्हा जेंव्हा बघतेस तू वेडं करुन जातेस तू
संघर्ष होतो माझा मझ्याशी जिंकुन मात्र जातेस तू’

तू म्हणतेस..
’माझ्या वेगळ अस मत तूला कधीच का नसत
मी जे काही म्हणते तुला खरच का पटतं’
मी म्हणतो..
’तुझ प्रत्येक म्हणण मला पटतच अस नाही
पण काय करु तुला कधी नाही म्हणवत नाही’

तू म्हणतेस..
’कधी कधी मलाही वाटत तुझ्या सारख वागव
सारख बोलण्यापेक्षा कधी गप्पबसुन ऐकाव’
मी म्हणतो
’लाटे सारख जगणं कधी किनाऱ्याला जमत नाही
तुझ्याशिवाय शब्दांना माझ्या अर्थ काही उरत नाही’

आहे एक वेडी मुलगी...



आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला

सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?

तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?

''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!

जे सांगायचं आहे ते आजच सांगा...



जे सांगायचं आहे ते आजच सांगा
उद्या कदाचित मी नसेन
आज तुम्ही माझी चेष्टा करताय
उद्या कदाचित मी तुमच्यावर हसेन

मी आज तुमच्यासाठी आहे
उद्या कदाचित तुम्ही माझी वाट पाहाल
जे तुम्हाला आज दिसत नाही
उद्या कदाचित ते तुम्ही बघाल

मी आज मीच आहे
उद्या कदाचित नाही राहणार
आज माझ्या नावाला मी ओ देतो
उद्या कदाचित वळूनही नाही बघणार

आज आपलं नातं आहे
उद्या कदाचित ते नाही उरणार
आज मला दु:ख होतं
उद्या कदाचित काहीच नाही जाणवणार

आज असाल तुम्ही कामात व्यस्त
उद्या कदाचित मी मागणार नाही धीर
आज तुम्हाला नाही माहीत मी कोण आहे
उद्या कदाचित झाला असेल उशीर

होता एक वेडा मुलगा...



होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..


कधी तिच्या केसांत गुंतायचा,
कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा,
तर कधी गालवर
गोड हसू आणायचा...

नेहमी काहीना काही उपमा द्याचा
आज परी तर उद्या सरी..........!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा

पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा

कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून
खुप गोड हसायची............!

पण कवीता तिला कधीच समजली नव्हती
कारण प्रेम फक्त तोच करायचा.............!
आज नाही त्याच्या आयुषात ती
तरी कवीता करतोय...........!
एक आठवण म्हणुन,
एक समाधान म्हणुन,

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा,
अगदी माझ्यासारखा.............

ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !



ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !
ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !
स्वप्न परीचे पाहिले की तिला सांगायचो,
परीचा राजकुमार मीच अशा काही कल्पना करायचो,
स्वप्नात हि स्वप्ने रंगवत असाच काही वागायाचो,

ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !
मनातल्या भावना तिच्या कडे व्यक्त करायचो,
उगवत्या सूर्या पासून ते मावलत्या सूर्या पर्यंत
फक्त तिच्या गोष्टी करायचो,
रात्रीच्या चंद्रा कडे पाहुन तिच्याच स्वपनात डुबायचो,

ती नेहमी म्हणायची
पण एकनारातला मी कोण...?
स्वप्ने पहाता-पहाता इतका काही गुंतलो,
की पुन्हा वास्तव्यात येन स्वप्न होउन राहिले,
मैत्री हि हरवली,
परी हि हरवली,
राहिला तर फक्त पचतावा....!

कोण म्हणन एक तर्फ़ी प्रेमात काहिच काहि नसत...
























कोण म्हणन एक तर्फ़ी प्रेमात काहिच काहि नसत
मी म्हणतो एक तर्फ़ी प्रेमात बरच काहि असत...

बिलगलेल्या तिच्या ओठांना शब्द आपण द्यायचे असतात
शोधायचि असतात ति स्वन्प जि तिच्या डोळ्यात कधिच नसतात
डगमगणार्‍या मनाला मग आपण सावरायच असत...

कोण म्हणन एक तर्फ़ी प्रेमात काहिच काहि नसत...

कधितरि मग तिची रत्यात गाठ पडते
साथिस तिच्या कोण्या एका देखण्या तरुणाची सोबत असते
हसुन मग आपण त्याला तिचा भाऊ म्हणायच असत

कोण म्हणन एक तर्फ़ी प्रेमात काहिच काहि नसत...

वेलंटाइन डे ला धिर करुन आपण फ़ुल घेउन जातो
पोटभरुन तिच्याकडुन मग यथेच्य शिव्या खातो
इतक सगळ होऊन सुद्धा तिला आपण दोषी धरायच नसत...

कोण म्हणन एक तर्फ़ी प्रेमात काहिच काहि नसत
मी म्हणतो एक तर्फ़ी प्रेमात बरच काहि असत...

‘हसलो’ म्हणजे ‘सुखात आहे’ ऐसे नाही



















‘हसलो’ म्हणजे ‘सुखात आहे’ ऐसे नाही॥
‘हसलो’ म्हणजे ‘दुखले नव्हते’ ऐसे नाही..
‘हसलो’ म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे
म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही ! …

‘हसलो’ म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती
निर्लज्जागत दिधली होती स्वत:स टाळी
‘हसलो’ कारण शक्यच नव्हते दुसरे काही
‘डोळ्यामध्ये पाणी नव्हते’ ऐसे नाही !

‘हसलो’ कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही !
‘हसलो’ कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !
‘हसलो’ कारण दुसर्‍यांनाही बरे वाटते
‘हसलो’ कारण तुलासुद्धा ते खरे वाटते !
‘हसलो’ म्हणजे फक्त डकवली फुले कागदी
‘आतुन आलो होतो डवरून’ ऐसे नाही..

‘हसलो’ कारण शास्त्राची मज ओळख होती
अश्रु जाळण्यामधे जाते अधिक शक्ति !
‘हसलो’ कारण हिशोबास या दमलो नाही
‘हसलो’ कारण रडण्यामध्ये रमलो नाही !

‘हसलो’ कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे !
‘हसलो’ कारण सत्याची मज भीती नाही
‘हसलो’ कारण फसण्याचा धसका नाही..

प्रेम तुझं खरं असेल तर...




प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

ही कविता म्हणजे, प्रेमात हताश, निराश झालेल्या एका प्रेमवीराला, त्याच्या
मित्रा कडून दिलेला सल्ला, नवी उमेध, नवी चेतना…….